हाँगकाँगमध्ये ट्रेन रुळावरून घसरली, 8 जण जखमी

हाँगकाँगमध्ये ट्रेन रुळावरून घसरल्याने एक व्यक्ती जखमी
हाँगकाँगमध्ये ट्रेन रुळावरून घसरल्याने एक व्यक्ती जखमी

हाँगकाँगमध्ये ट्रेन रुळावरून घसरली, 8 जण जखमी. अनेक आठवड्यांपासून चीनविरोधी निदर्शने करणाऱ्या हाँगकाँगमध्ये रेल्वे अपघात झाला.

हाँगकाँगमधील शेकडो प्रवासी असलेली ट्रेन कोलूनमध्ये रुळावरून घसरली. या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. अपघात क्षेत्राची नाकेबंदी करण्यात आली असून, अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्यांपैकी ५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या जखमींना रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्या खांद्यावर आणि मानेला जखमा होत्या.

अपघात क्षेत्राची नाकेबंदी करण्यात आली असून, अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टिप्पणी करणारे प्रथम व्हा

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.


*