जपानमध्ये ट्रकची ट्रेनला धडक, 34 जखमी

जपानमध्ये ट्रकने ट्रेनला धडक दिल्याने जखमी
जपानमध्ये ट्रकने ट्रेनला धडक दिल्याने जखमी

जपानमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर एका ट्रकची ट्रेनला धडक बसली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात किमान 34 जण जखमी झाले आहेत.

जपानची राजधानी टोकियोजवळील योकोहामा येथे आज स्थानिक वेळेनुसार 11.40 वाजता हा अपघात झाला. रेल्वे क्रॉसिंगवर ट्रकची ट्रेनला धडक बसली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 34 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर फळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली आणि रेल्वेच्या वॅगन्सचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर केक्यू कावासाकी आणि कामियोका स्थानकांदरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली.

अपघाताचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी करणारे प्रथम व्हा

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.


*