रशियात बस आणि ट्रेनची टक्कर! 19 मृत

रशियाच्या व्लादिमीर ओब्लास्ट शहरात ट्रेन आणि बस यांच्यात झालेल्या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाल्याची माहिती आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोपासून 190 किलोमीटर पूर्वेला व्लादिमीर ओब्लास्त शहरातील पोकरोव्का स्टेशनजवळ ट्रेन आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत 19 जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोकरोव्का स्टेशनजवळ दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला.

चौकशी समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या घटनेत १९ जणांना जीव गमवावा लागला. इतर प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले.” असे म्हटले होते.

या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टिप्पणी करणारे प्रथम व्हा

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.


*